जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तपास सुरू केला होता. यावेळी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ₹4.56 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सुनिल पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दीपक शिरसाठ, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Author: K P Chavan
thepubliclive


