जामनेर : IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरात एका घरामध्ये ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईदरम्यान पोलिसांना तब्बल ₹9 लाख 2 हजार 300 रुपयांची रोख रक्कम, ₹1 लाख 30 हजार किमतीचे मोबाईल फोन, ₹25 हजार किमतीचा टीव्ही व साउंड बार, तसेच 41 एटीएम कार्ड आणि इतर साहित्य मिळून आले. एकूण ₹10 लाख 53 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे :
देवानंद सुभाष सोनवणे, रा. जामनेर
रितेश अशोक नेरकर, रा. जामनेर
परीक्षित रविंद्र पाटील, रा. जामनेर
प्रवीण जगन्नाथ टहाकडे, रा. जामनेर
सदर प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 236/26 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




