November 6, 2026 12:20 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार!

जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार!

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहराच्या विकासाला मोठे बळ मिळाले असून, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा विकास व्हावा, विविध भागांतील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

१९ प्रभागांतील विकासकामांना मिळणार गती

या निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यासोबतच शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत भागांमधील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, प्रमुख प्रवेशमार्ग रात्रीच्या वेळी प्रकाशमान होणार आहेत. यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुविधाजनक वातावरण उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

प्रलंबित रस्त्यांच्या कामांसाठीही पाठपुरावा सुरू

जळगाव शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले. शहरातील विविध भागांतील उर्वरित विकासकामांसाठी भविष्यातही शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे मानले आभार

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आपले ध्येय आहे. जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केली.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!