Home » जळगाव » नोकरीचे आमिष देवून तरुणीवर अत्याचार : भुसावळ हादरले !

नोकरीचे आमिष देवून तरुणीवर अत्याचार : भुसावळ हादरले !

भुसावळ : प्रतिनिधी

राज्यातील अनेक ठिकाणी तरुणी व महिलावर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच आता भुसावळ शहरात राहणाऱ्या एका परप्रांतीय अठरा वर्षीय तरुणीला काम मिळून देण्याचे आमिष देत तरणीवर अत्याचार केला. याबाबत गुरूवारी दि. २७ रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मेघालय राज्यातील १८ वर्षीय तरूणी ही काम मिळविण्यासाठी भुसावळ शहरात एप्रिल २०२४ पासून आलेली आहे. तिची मुन्नी नामक महिलेशी ओळख निर्माण झाली. या महिलेने तरूणला चेतन नावाच्या तरूणाशी ओळख करून दिली. दरम्यान चेतनने तरूणीला काम मिळवून देण्याची आश्वासन दिले. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर पिडीत तरूणीला काम मिळाले नाही. अखेर या त्रासाला कंटाळून तरूणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी दि. २७ रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चेतन आणि मुन्नी (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) यांच्व्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल हे करीत आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *