November 7, 2026 4:35 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » शेतकरी आर्थिक संकटात : कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे केली मागणी !

शेतकरी आर्थिक संकटात : कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे केली मागणी !

मुंबई  : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासना प्रमाणे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेकडे लक्ष लाऊन बसला आहे तर दुसरीकडे सोयाबीन अन कापसाला भाव दिला जात नाही. या प्रश्‍नांवर कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आपण लक्ष घालावे, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 20 दिल्ली येथे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नामदेव कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, अमोल एकशिंगे, प्रवीण मते पाटील, संतोष माहूरकर, वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, सतीश विडोळे, शामराव मते, देवानंद जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनामध्ये कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची भेट घेतली.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा केली. निवडणुकीपुर्वी शासनाने कर्जमाफीचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतरही कर्जमाफीची कुठल्याही प्रकारची घोषणा सरकारने केलेली नाही. कर्जमाफीच्या विश्‍वासावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेकडून होल्ड लावला जात आहे. त्यामुळे एकीकडे कर्जमाफी नाही तर दुसरीकडे खात्याला होल्ड लावल्याने पैसे काढता येत नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित करण्यात आला. या सोबतच शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही. सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे भाव चांगलेच कोसळले आहे. अतिवृष्टीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी कसेबसे आहे त्या पिकाची काढणी केली. मात्र उतारा घटल्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे सध्या राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमुद केले.

संपूर्ण कर्जमाफीची घोषणा शासनाने त्वरीत करावी, सोयाबीन, कापूस व इतर शेतीमालास भाव द्यावा यासह इतर मागण्यांकडे लक्ष देण्याची अग्रही मागणी केली. यावेळी आयोगाचे अध्यक्ष पटेल यांनी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्याचे आश्‍वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!