Home » जळगाव » डॉ.सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजची उज्ज्वल यशाची परंपरा कायम !

डॉ.सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजची उज्ज्वल यशाची परंपरा कायम !

जळगाव : प्रतिनिधी

उज्वल यशाची परंपरा कायम राखत मेहरूण परिसरातील डॉ. सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरूण या कॉलेजचा निकाल १००% लागला असून, विज्ञान शाखा १००%, वाणिज्य शाखा १००% व कला शाखा ९४.७३% निकाल लागला. इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार जळगावच्या मा.महापौर सौ.जयश्रीताई महाजन मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

विज्ञान शाखेतून प्रथम – योगनंदिनी माळी (८८.८३%), द्वितीय – सिद्धी महाजन (८८.५०%), तृतीय – श्रद्धा महाजन (८८.३३%) आणि सोहम चौधरी (८८.३३%) वाणिज्य शाखेतून प्रथम – शुभम चव्हाण (८४.८३%), द्वितीय – भावना सोनवणे (७७.५०%), तृतीय – कार्तिकी सोनवणे (७७.३३) कला शाखेतून प्रथम – कुमकुम पाटील (८१.५०%), द्वितीय – जतीन वराडे (७५.३३%), तृतीय – चैताली जाधव (६८.५०%) या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. प्रसंगी सौ. कामिनी महाजन मॅडम, श्रीम.अश्विनी फालक मॅडम, श्रीम. कुमुदिनी बेंडाळे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री, चंद्रकांत पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सहभाग घेतला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *