Home » जळगाव » जळगाव-जामनेर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

जळगाव-जामनेर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव-जामनेर रस्त्यावरील उमाळा गावाजवळ बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतातून घरी जात असताना शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळे, ता. जळगाव) या शेतकऱ्यास भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होवून त्यांचा उपचारापुर्वीच दुर्देवी मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून पसार झाला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील उमाळे गावात शरद पाटील हे वास्तव्यास असून ते आई, वडील पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. शेती काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी शरद पाटील शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी शेतातून दुचाकीने घरी परतत असताना जळगाव-जामनेर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शरद पाटील गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळले. दुचाकीस्वार शरद पाटील यांना धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला अपघाताची माहिती मिळताची परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील शरद पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत शरद पाटील यांना मयत घोषीत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *