Home » जळगाव » गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून दहशत माजविणारा अटकेत !

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून दहशत माजविणारा अटकेत !

पाचोरा : प्रतिनिधी

शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून दहशत माजविणाऱ्या समाधान बळीराम निकम (वय ३७, रा. जाधववाडी, पाचोरा, मूळ रा. अंजाळा, ता. यावल) याला पाचोरा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना शहरातील गिरणा पंपिंग परिसरात एक इसम गावठी कट्टा घेवून दहशत माजवित असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील रणजित पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, गणेश कुवर, श्रीराम शिंपी यांच्यासह एलसीबीचे लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले.

या पथकाने सापळा रचून संशयित समाधान निकम याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळून गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, स्टील मॅग्झीन व हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शत्र, चोरी, मारहाण, विनयभंग, खूनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचे एकूण ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *