Home » जळगाव » पकडलेले वाहन सोडण्यासाठी घेतली एक लाखांची लाच : जळगाव एसीबीची कारवाई !

पकडलेले वाहन सोडण्यासाठी घेतली एक लाखांची लाच : जळगाव एसीबीची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी

शेतातील निंबाचे झाड तोडून त्याची बेकायदेशीर वाहतुक करणारे वाहन सोडून देण्याच्या मोबदल्यात लाख रुपयांची लाच मागणारे वन विभागातील कर्मचारी वैशाली गायकवाड, वखार मालक सुनिल धोबीसह अन्य एका कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल केला.

सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहरात रहणारे तक्रारदार यांच्या शेतातील निंबाचे झाड तोडून त्या लाकडाची (एमएच १८, एम ५५०८) क्रमांकाच्या वाहनातून वाहतुक केली जात होती. बेकायदेशीर लाकूड वाहतुक करणारे वाहन सोडून देण्याच्या मोबदल्यात पारोळा वन विभागातील कर्मचारी वैशाली गायकवाडसह अन्य एकाने खासगी इसम श्रीकृष्ण सॉ मीलचे मालक सुनिल धोबी यांच्या मध्यस्तीने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतू पंचासमक्ष तडजोडीनंतर एक लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या मागणीला वन विभागातील एका कर्मचाऱ्याने प्रोत्साहन दिले होते. परंतू तक्रारदाराने दि. १० डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. एक लाख रुपये स्विकारण्याचे मान्य करताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांविरुद्ध कारवाई करीत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे या करीत आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक नेहा तुषार सुर्यवंशी यांच्या पथकाने केली. पथकात सपोउपनि दिनेशसिंग पाटील, पोना राकेश दुसाणे, पोना बाळू मराठे (जळगाव), पोहवा विनोद चौधरी, चापोहवा परशुराम जाधव (नाशिक), पोहवा नरेंद्र पाटील आणि पोना सुभाष पावरा (नंदुरबार) यांचा समावेश होता. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *