जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी ०२ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यत एकूण ६.०१% सरासरी मतदान नोंदवले गेले असून, यावल नगरपंचायतीने सर्वाधिक मतदान नोंदवून विशेष लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील ८,८१,५१० पैकी ५,२९,९७७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून काही ठिकाणी मतदारांची संथ उपस्थिती दिसून आली, तर ग्रामीण व उपनगरी भागात मतदान हळूहळू वाढताना दिसले.

-
यावल – १०.८७% (जिल्ह्यातील सर्वाधिक)
-
फैजपूर – १०.०३%
या दोन्ही नगरपंचायतींत सकाळपासून मतदारांची चांगली उपस्थिती दिसली. स्थानिक प्रशासकीय तयारी आणि जनजागृती मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.
-
पाचोरा – ३.६५%
जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान पाचोरा नगरपरिषदेत झाले. अनेक मतदार केंद्रांवर अपेक्षित गर्दी दिसली नाही, तर काही ठिकाणी तांत्रिक कारणांनी मतदान सुरळीत सुरू होण्यास विलंब झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उद्या होणाऱ्या मतमोजणीवर सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, स्थानिक पातळीवरील गट-तट आणि विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांनी कोणावर विश्वास ठेवला आहे, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.



