Home » जळगाव » अभियंता तरुणाने शेतात घेतला टोकाचा निर्णय !

अभियंता तरुणाने शेतात घेतला टोकाचा निर्णय !

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील बाळद येथील २६ वर्षीय तरुणाने आपल्या शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बाळद येथील समाधान बाळू चव्हाण हा पुण्यातील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून गेल्या पाच सहा वर्षांपासून नोकरीला होता. शनिवारी सकाळी तो पुण्याहून बाळदला आल्यावर त्यांने आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच, गावातील ग्रामस्थांसह पोलिस पाटील नितीन पाटील यांनी नगरदेवळा दूरक्षेत्राला घटनेची माहिती दिली.

समाधान चव्हाण याची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. वडिलांचा व्यवसाय शेती असून, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपले शेत विकून त्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्याला पुण्यातील एका नामांकित कंपनीत पाच-सहा वर्षापूर्वी नोकरी लागली. समाधान हा गावात आल्यानंतर त्याच्या कुटुंबासह प्रत्येक मित्रांची चौकशी करत होता, परंतु त्याच्या निधनाने त्याच्या कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.  पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील, हरीश पाटील यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पंचनाम्यानंतर शव विच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मयत समाधान याच्या पश्चात आईवडील, भाऊ असा परिवार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *