September 24, 2026 6:54 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » ताज्या » पतीचा अचानक मृत्यू : पत्नीने संशय व्यक्त केल्याने चार अटकेत !

पतीचा अचानक मृत्यू : पत्नीने संशय व्यक्त केल्याने चार अटकेत !

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पहूर येथे माहेरहून आलेल्या पत्नीला घरात पतीचा मृतदेह दिसल्याने तिने एकच हंबरडा फोडला. लग्नाच्या वाढदिवशी झालेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पतीच्या अचानक मृत्यूबाबत पत्नीने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणगाव बढे येथील रहिवासी सुनील उदयभान शेलेकर (३६) व पत्नी शुभांगी शेलेकर (ह.मु, शेंदुर्णी) येथे भाड्याच्या घरात राहत होते. सुनील हे खासगी कामे करत होते. पत्नी शुभांगी या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. ३१ मे रोजी त्या माहेरी गेल्या होत्या. २ जून रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. १ जूनला रात्री पत्नी शुभांगी यांनी सुनील यांना फोन लावला; पण लागला नाही. शुभांगी घरी येताच त्यांना पतीचा मृतदेह निदर्शनास पडला. पहूर रुग्णालयात मृतदेह दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. याठिकाणी पत्नी शुभांगी व भाऊ गजानन शेलेकर यांना घातपाताचा संशय आल्याने शवविच्छेदन पहूर येथे न करता जळगाव येथील शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा करण्यात आले.

सुनील यांचा लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील व अन्य दोन मित्रांनी १ जून रोजी दुपारी पार्टी केली. त्यानंतर १ जून रोजी रात्री एक ट्रॅक्टरचालक मित्र पहूर नाक्यावर भेटला. त्या ट्रॅक्टरवर सुनील बसला. मात्र त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्याचा अपघात घडला. ट्रॅक्टरचालकाने गावातील एका साथीदाराला बोलावून घेत जखमी अवस्थेत सुनीलला घरी सोडले, असा ट्रॅक्टरचालकाने कबुली नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. चार संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा फोन फोडला आहे. यामागे घातपात असल्याने संबंधित मारेकऱ्यांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी यावी, अशी मागणी करणारा अर्ज पत्नी शुभांगी हिने ६ जूनला सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना दिला आहे.  पोलिसांनी सुनील मृत्यूप्रकरणात ताब्यात घेतलेल्या चौघांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणातील एका संशयिताने तर अपघातात तो जखमी झाल्याचे सांगितले आहे. उर्वरित तिघांकडूनही त्यांची वेगवेगळी चौकशी करून माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी या चारही जणांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. चौकशीनंतर अनेक मुद्दे बाहेर येतील, असे पोलिसांनी म्हटले असून याप्रकरणी निष्पक्षपाती चौकशी केली जाईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी सांगितले.

याबाबत पत्नीने पोलिसांना सांगितले की, अज्ञात मारेकऱ्यांनी माझ्या पतीच्या अंगावर मारहाण करून घातपात केला आहे. मी घरात पोहोचल्यावर पतीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. मारेकऱ्यांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्नी शुभांगी हिने पहूर पोलिसांकडे केली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!