Home » जळगाव » अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिल भिका बनसोडे (वय ३८, रा. रायपुर, ता. जळगाव) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. ४ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपूर येथे सुनिल बनसोडे हे वास्तव्यास होते. दि. २ रोजी अपघात झाल्याने त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचयावर उपचार सुरु असतांना दि. ४ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईकांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना पंकज पाटील हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *