November 10, 2026 11:19 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » कंडारीत तरुणाचा खून : पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

कंडारीत तरुणाचा खून : पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी दि. ५ ऑक्टोबर रात्री सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना समोर येताच जिल्हाभरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी (वय ४०) हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका वैयक्तिक कामानिमित्त गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच चकमकीत परिवर्तित झाला आणि तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली.

घटनेची माहिती मिळताच मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी मा. श्री राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांना आदेश दिले की खुनातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन प्रकरण उघडकीस आणावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात PSI गोरे, पोकॉ सिद्धेश डापकर, रतन गीते, सलीम तडवी, मयूर निकम, किशोर पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल नरवाडे, आणि शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी योगेश साबळे यांचा समावेश होता. या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

या संशयित आरोपी राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव) मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) या दोन्ही संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या पथकाने तपासाच्या दिशेने निर्णायक हालचाल करत दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी, ता. भुसावळ) या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं. या कारवाईत भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमागील नेमकं कारण आणि इतर कोणतेही सहकारी असल्यास त्यांचा शोध सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!