Home » जळगाव » कामावरून काढल्याचा राग : दारूच्या नशेत शिवीगाळ !

कामावरून काढल्याचा राग : दारूच्या नशेत शिवीगाळ !

जळगाव : प्रतिनिधी

आपल्याला यांनीच कामावरुन काढल्याच्या गैरसमज झाल्याच्या कारणावरुन दि. १ जुलै रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या गेटसमोर मनोहर बळीराम चौधरी (वय ६०, रा. नवीन भगवान नगर) यांना संशयित प्रवीण सिंगरुपे (रा. चंदूआण्णा नगर) यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ केली.

तसेच तुला चाकूने मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. मनोहर चौधरी यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *