जळगाव : प्रतिनिधी
अंगणात कांद्याची सालं फेकल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्यांनी अभिमन अवचित भालेराव (५६, रा. पिंप्राळा हुडको) यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. ही घटना १९ एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा हुडको येथे राहणारे भालेराव यांच्या पत्नीने अंगणात कांद्याची सालं फेकली. त्याचा राग आल्याने शेजारी राहणाऱ्या चार जणांनी भालेराव यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच भालेराव यांच्या पत्नी आणि मुलीलादेखील मारहाण केली. एका जणाने धारदार शस्त्राने भालेराव यांच्या डोक्यावर, तर दुसऱ्याने हातातील कड्याने मारून गंभीर दुखापत केली. याबाबत पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण करीत आहेत.
