Home » महाराष्ट्र » मोठी बातमी : राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय !

मोठी बातमी : राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. २३) मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले. आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग, गृह विभाग आणि गृहनिर्माण विभागाअंतर्गत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोण कोणते निर्णय घेण्यात आले आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
मंत्रिमंडळाचे महत्वाचे आठ निर्णय (संक्षिप्त)

आरोग्य विभाग :

शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी.

परिवहन विभाग :

नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती. या १९६.१५ कि.मी. नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मधील रुपांतरणाच्या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

महसूल विभाग

अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलाला जागा. मौजे अकोला येथील २४ हजार ५७९.८२ चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी.

महसूल विभाग :

सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील कॉ. मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासककाच्या माध्यमातून बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.

महसूल विभाग :

वसई विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीसाठी आचोळे ( ता. वसई, जि. पालघर) येथील जमीन देण्यास मंजुरी.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *