November 8, 2026 1:58 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवून भाजप कार्यकर्त्यानी केला सत्कार !

काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवून भाजप कार्यकर्त्यानी केला सत्कार !

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

डोंबिवलीतील काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश उर्फ ‘मामा’ पगारे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला एडिटेड फोटो शेअर केला होता. ‘माफ करना लडकियों, हम भी ट्रेण्ड मे रहना चाहते है’ असे कॅप्शन देत त्यांनी या व्हिडिओला ‘मी कशाला आरशात पाहू गं’ हे गाणे जोडले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली.

साडी नेसवतानाचा व्हिडिओ व्हायरल

प्रकाश पगारे यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने प्रकाश पगारे यांना मार्केटमध्ये भर रस्त्यावर साडी नेसण्यास लावून त्यांचा जाहीर सत्कार केला. तत्पूर्वी, प्रकाश पगारे यांनी यासाठी विरोध केला, मात्र, भाजपचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. पंतप्रधान मोदींवर टीका करायची तुमची लायकी आहे का? असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी पगारे यांना साडी नेसवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या कृत्याचा निषेध करताना भाजप कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, राजकीय मतभेद असू शकतात, परंतु देशाच्या पंतप्रधानांचा असा अपमान करणे चुकीचे आहे. या व्यक्तीने मोदीजींना साडी नेसवली होती. ती पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल केली होती. त्यामुळे आम्ही त्यांना साडी नेसवून त्यांचा सत्कार केला. भविष्यात कोणीही भाजपच्या किंवा कोणत्याही वरिष्ठ नेत्याची अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचीही अशीच अवस्था होईल, असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!