पाचोरा : प्रतिनिधी
वरखेडी भोजे दरम्यान टेम्पोची मोटारसायकलला जोरदार धडक बसून एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे. टेम्पो चालकाविरुद्ध पिंपळगाव हरे. पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास संदीप उत्तम पाटील आणि दिलीप उत्तम पाटील हे दोन्ही भाऊ दुचाकी क्रमांक एम.एच. ५४, ए. ४८९ ने वरखेडीहून भोजे गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या मालवाहतूक वाहन क्रमांक एम.एच. १९, सी.वाय. ८६६६ ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक दिलीप पाटील हा रस्त्यात पडला. तो दगडावर पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. यावेळी तत्काळ टेम्पो चालकाला पकडले. त्याचे नाव सुनील गुलाबराव पाटील असे सांगितले. त्याच्या मदतीने दिलीप पाटील यास पाचोरा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. संदीप पाटील याने फिर्याद दिल्यावरून टेम्पो चालक सुनील पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे



