जळगाव : प्रतिनिधी
दोन वर्षाकरीता हद्दपार असलेला महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३२, रा. तळेले कॉलनी) तर बाजारपेठेत चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्या संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) या दोघांवर कारवाई करीत जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी दि. २७ रोजी शनिपेठ पोलिसांनी केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, खून, प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर गुन्ह्यातील संशयित असलेल्या महेंद्र उर्फ लहाण्या महाजन याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. हा हद्दपार असलेला संशयित रथ चौकात फिरत असल्याचे माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच कर्तव्यावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने हद्दपार महेंद्र महाजन याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेशोत्साच्या आमनाच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या शनिपेठ पोलिसांना भिलपुरा ते घाणेकर चौक दरम्यान, संशयित संदीप विजय नाथ (वय २८, रा. नाथगल्ली, तांबापुर) हा चॉपर घेवून दहशत माजवित होता. शनिपेठ पोलिसांनी त्याच्या आवळून त्याच्याकडून धारदार चॉपर हस्तगत केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साजीद मन्सरी उपनिरीक्षक योगेश ढिकले गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ प्रमोद पाटील, शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, नवजीत चौधरी, योगेश साबळे, रविंद्र तायडे, निलेश घुगे, अमोल वंजारी, पराग दुसाने व प्रतिभा खैरे यांच्या पथकाने केली
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



