Home » जळगाव » कार वाहनावर धडकली; एक ठार, तीन जखमी : नवीन बायपासवर पुन्हा अपघात !

कार वाहनावर धडकली; एक ठार, तीन जखमी : नवीन बायपासवर पुन्हा अपघात !

जळगाव : प्रतिनिधी 

मित्राच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आटोपून नाशिक येथे परत असताना कार वाहनावर धडकल्याने दीपक श्रीपतराव सोमवंशी (५८, रा. नाशिक) हे ठार झाले, तसेच दिलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार (सर्व रा. नाशिक) हे जखमी झाले. हा अपघात रविवारी (१ मार्च) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भोकणी गावाजवळ नवीन बायपासवर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  नशिराबाद येथील शिक्षक मित्राच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी नाशिक येथून दीपक सोमवंशी, दिलीप सोमवंशी, ललित भंगाळे व राजू सरदार हे चौघे मित्र कारने (क्र. एमएच १५, जीएक्स १८७२) नशिराबादला आले होते. कार्यक्रम आटोपून ते रविवारी पहाटे नशिकला जाण्यासाठी निघाले. भोकणी गावाजवळ बायपासवर उभ्या वाहनावर कार धडकली. ही धडक एवढी जोरात होती की, कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. घटनास्थळी पाळधी पोलिस ठाण्याचे प्रभारी कृष्णा कंडारे व त्यांचे सहकारी पोहोचले. त्यांनी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दीपक सोमवंशी यांना मयत घोषित केले. अपघातात ठार झालेले दीपक सोमवंशी हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन रेल्वे दलात नोकरीस लागले. तेथूनही ते निवृत्त झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *