Home » जळगाव » मंदिरातील दानपेटी लांबविली : तीन अल्पवयीन ताब्यात !

मंदिरातील दानपेटी लांबविली : तीन अल्पवयीन ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

रात्री मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तीन अल्पवयीन मुलांनी दानपेटी लांबविली. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलिसांनी शोध घेत तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोकड व दानपेटी हस्तगत गेली. ही घटना ५ ते ६ जूनदरम्यान गणपतीनगरात घडली.  गणपती नगर परिसरात असलेले गणपती मंदिर ५ जून रोजी रात्री पुजाऱ्याने बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी मंदिरात चोरी केली होती.

या प्रकरणी विलास रमेश सांगोरे (५२, रा. आदर्श नगर) यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ही चोरी तीन अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. तपासाधिकारी पोहेकॉ सुशील चौधरी यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोकड व ५ हजार रुपये किमतीची दानपेटी हस्तगत केली. तीनही अल्पवयीन मुलांना समज देऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *