Home » जळगाव » वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरभर सुरक्षेचा संदेश

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरभर सुरक्षेचा संदेश

जळगाव : प्रतिनिधी

वाहतुक सुरक्षा सप्ताहनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातून हेल्मेट मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी हेल्मेट परिधान करीत उत्सफुर्त सहभाग घेत हेल्मेटबाबत जनजागृती केली.

शहरातील पोलीस मुख्यालयातून या रॅलीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी गृह विभाग आव्हाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. रॅलीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शनिपेठ पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्यासह अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक, महाबळ, छत्रपती संभाजी महाराज चौकमार्गे पुन्हा त्याच मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयात या हेल्मेट रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये नागरिकांनी वाढते अपघात रोखण्यासाठी व स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचे महत्व काय याबाबत जनजागृती केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *