November 5, 2026 8:37 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Home » जळगाव » कामावर गेले आणि मागे राहिली राख; कुसुंब्यात भीषण आग

कामावर गेले आणि मागे राहिली राख; कुसुंब्यात भीषण आग

जळगाव : प्रतिनिधी 

कामानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असताना बंद घराला अचानक आग लागून टीव्ही, फॅन, कपडे, भांडी यासह घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती घरमालकाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील रहिवासी सुनील लहू सोनवणे (वय ४८) हे मजुरी काम करतात. कामानिमित्त ते व कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेर गेलेले असताना बंद असलेल्या घरातून अचानक धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच परिसरातील रहिवाशांनी घरमालकास माहिती दिली.

आग वाढत असल्याने शेजारील नागरिकांनी तातडीने पाणी मारून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील टीव्ही, सिलिंग व टेबल फॅन, पलंग, भांडी, कपडे यासह संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत घरातील सर्वकाही नष्ट झाले असून केवळ अंगावरील कपडे शिल्लक राहिल्याने आपला संसार उघड्यावर आला असल्याची भावना घरमालक सुनील सोनवणे यांनी व्यक्त केली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!