बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका घटनेत पायाने दिव्यांग व आजाराने त्रस्त असलेल्या आशासेविकेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले, तर दुसऱ्या घटनेत विषारी द्रव्य प्राशन केलेल्या पंचावन्न वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भीमनगर परिसरात राहणारी छाया वसंत तायडे (वय ४३) या आशासेविका असून त्या पायाने दिव्यांग होत्या. रविवारी (दि.१) दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले जात असून त्यांचे आई-वडील कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असल्याने त्या घरी एकट्याच होत्या. घटनेची माहिती मिळताच परिसरात
दरम्यान, तालुक्यातील साळशिंगी येथील राजाराम रामचंद्र कुन्हाडे (वय ५७) यांनी राहत्या घरात विषारी द्रव्य सेवन केल्याची घटना घडली. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे बोदवड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून संबंधित प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



