भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील इंद्रप्रस्थ नगर रोडवर चार संशयित तरुणांना पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान थांबवून तपासणी केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यापैकी एक तरुण घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला.
सविस्तर वृत्त असे कि, ६ ऑगस्ट रोजी दुपारी भुसावळ शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, पोलिस नाईक संजय ढाकणे, दीपक शेवरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील हे पेट्रोलिंग करत असताना, इंद्रप्रस्थ नगर रोडवर दोन मोटरसायकलींवर चार तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले.
पोलिसांना पाहून चौघेही पळू लागले. त्यापैकी तिघांना तत्काळ अडवून त्यांची झडती घेण्यात झडतीदरम्यान आली. एका अल्पवयीन तरुणाच्या कमरेजवळ गावठी कट्टा आणि मॅगझीनसह ४ जिवंत काडतुसे आढळून आली. फरार संशयित तरुणाचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रज्जाक खान करत आहेत.
