Home » राष्ट्रीय » जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर आकाशात; अमेरिका-इराण संघर्षाचा थेट परिणाम !

जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर आकाशात; अमेरिका-इराण संघर्षाचा थेट परिणाम !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अमेरिका-इराण दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. रविवारी जागतिक भू-राजकीय तणावामुळे सोन्याचे दर १२,००० रुपयांपर्यंत वाढले तर चांदीच्या दरात २३,००० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली होती. सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोन्याचे दर सुमारे १,००० रुपयांनी कमी झाले असून, चांदीच्या दरात देखील घट दिसून आली. दोन्ही धातुंच्या दरात झालेल्या बदलामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईनंतर जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे जास्त लक्ष दिले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही सोनं-चांदीच्या किमतींमध्ये ताण लक्षात आला. देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्येही सोनं आणि चांदीच्या किमती वाढत्या ट्रेंडवर राहिल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत असताना देखील गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंमध्ये पैसा गुंतवला. मध्य पूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण राहण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम आहे.

आजचे दर:

  • २४ कॅरेट सोनं: १ तोळा = १७१,५०० रुपये

  • चांदी: २,९५,००० रुपये

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *