नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरूच आहेत. काल संध्याकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली होती आणि आज सकाळच्या सत्रातही सोन्याने स्वस्ताईचा कल दाखवला आहे. दुसरीकडे, चांदीने मागील मरगळ झटकून पुन्हा महागाईकडे कूच केली असून ग्राहकांचा खिसा गरम ठेवण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली. ८ ते १० सप्टेंबरदरम्यान सोन्याने गरुडझेप घेत ग्राहकांना चांगलाच आर्थिक झटका दिला. मात्र, काल (१० सप्टेंबर) संध्याकाळपासून सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सकाळच्या सत्रातही हा कल कायम राहिला आहे.
- २४ कॅरेट सोन्याचा दर: ₹1,10,660 प्रति १० ग्रॅम
- २२ कॅरेट सोन्याचा दर: ₹1,01,450 प्रति १० ग्रॅम
तर इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,
- २४ कॅरेट: ₹1,09,100
- २३ कॅरेट: ₹1,08,660
- २२ कॅरेट: ₹99,930
- १८ कॅरेट: ₹81,820
- १४ कॅरेट: ₹63,820 प्रति १० ग्रॅम
चांदीचा भाव पुन्हा वधारला
चांदीने मागील आठवड्यातील घसरणीनंतर जोरदार उसळी घेतली आहे.
- ८ सप्टेंबर: ₹1,000 नी घसरण
- ९ सप्टेंबर: ₹3,000 नी वाढ
- १० सप्टेंबर संध्याकाळ: किंचित घसरण
- आज सकाळी गुडरिटर्न्सनुसार चांदी ₹1,29,000 प्रति किलोवर पोहोचली आहे.
- IBJA नुसार: ₹1,24,499 प्रति किलो
बदलते जागतिक संकेत आणि सणासुदीचा परिणाम
भारत आणि अमेरिकेतील टॅरिफ वॉरवर तोडगा निघण्याची शक्यता तसेच भूराजकीय तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असली तरी, सणासुदीच्या काळात दागदागिन्यांची मागणी वाढणार असल्याने दरांमध्ये पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.
सराफा बाजारात कर व शुल्काचा परिणाम
वायदे व आंतरराष्ट्रीय बाजारात कर-शुल्क नसल्याने तिथे दर थोडेसे वेगळे असतात. मात्र, स्थानिक सराफा बाजारात जीएसटी, मेकिंग चार्जेस व इतर शुल्क समाविष्ट असल्याने दर अधिक असतात.
