Home » ताज्या » ‘हॉटेल सरोवर’मध्ये हुक्का पार्लर ; एमआयडीसी पोलिसांचा छापा !

‘हॉटेल सरोवर’मध्ये हुक्का पार्लर ; एमआयडीसी पोलिसांचा छापा !

जळगाव : प्रतिनिधी

खाद्यपदार्थ विक्रीसाठीच्या रेस्टॉरंटचा परवाना असलेल्या शिरसोली रस्त्यावरील ‘हॉटेल सरोवर’मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर एमआयडीसी पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणाहून हुक्का पॉट व साहित्य, तसेच देशी-विदेशी मद्य, तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १२ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हॉटेलमालक सागर वलथानी (रा. सिंधी कॉलनी) व व्यवस्थापक अमित वर्मा (३६, रा. कालिंका माता चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शिरसोली रस्त्यावरील हॉटेल सरोवर येथे हुक्का पार्टी होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी सपोनि. अनिल वाघ, पोउनि. राहुल तायडे, पोहेकॉ. रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, चेतन पाटील, गिरीश पाटील, उमेश पवार यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने हॉटेलमध्ये कारवाई करीत विनापरवाना विक्री होणाऱ्या बियर, देशी-विदेशी मद्य, तसेच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे हुक्का आणि ते ओढण्याचे साहित्य असा एकूण १२ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मालक सागर वलथानी व व्यवस्थापक अमित वर्मा या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार अधिकार पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *