Home » जळगाव » तू शाहू नगरमध्ये कशी राहते, म्हणत शिवीगाळ !

तू शाहू नगरमध्ये कशी राहते, म्हणत शिवीगाळ !

जळगाव : प्रतिनिधी

या परिसरात भाड्याची खोली घेऊन का राहते, असा जाब विचारत शकिलाबी शरीफ खान (४०, रा. शाहूनगर) यांच्यासह त्यांच्या मुलीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. तसेच महिलेला चावा देखील घेण्यात आला. ही घटना २६ जून रोजी शाहूनगरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहूनगरात परिसरात शकिलाबी खान या राहतात. त्याच परिसरातील तीन जणांनी ‘तू या परिसरात भाड्याने खोली घेऊन राहू नको’ असे म्हणत वाद घातला. त्यावर महिलेने तुम्हाला काय त्रास होतो, असे विचारले असता तू शाहू नगरमध्ये कशी राहते, असे म्हणत शिवीगाळ केली व मारहाण केली. तसेच चावादेखील घेतला. सदर महिलेची मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी शकिलाबी खान यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भिला पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *