मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील २९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि क्रिकेटपटू-राजकारणी मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट, पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हेही प्रमुख प्रचारक असतील.
याशिवाय राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेते विविध भागांत प्रचार करणार आहेत. मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार असून, निकाल १६ जानेवारीला जाहीर केला जाईल. २,८६९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांत ३.४८ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.



