जैन हिल्सला राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा; बळीराजाचे पूजन

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा जळगाव : प्रतिनिधी ज्याप्रमाणे तंत्रज्ञान प्रगत होत आहे त्याप्रमाणेच मनुष्यालासुद्धा तंत्रज्ञानासोबत चालले पाहिजे. ड्रोन, एआयसह आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीत येत आहे त्याचा चपलख वापर केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी अभियांत्रिकी शेती केली पाहिजे. त्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण वर्गावर भर दिला जात आहे, यातून ड्रोन फवारणीसह अन्य […]
जळगावात बॅडमिंटनचा थरार; ‘जळगाव ओपन २०२५’ ला २५० खेळाडूंचा सहभाग

जळगाव : प्रतिनिधी रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँड कल्चर आणि रायसोनी इंजीनियरिंग कॉलेज जळगाव प्रायोजित व जैन इरिगेश सिस्टीम्स लि. सहप्रायोजीत तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंट जळगावात होणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेकडून मान्यता प्राप्त आहे. दि. २४ ते २८ डिसेंबर […]
फडणवीसांची सभा, तरीही जयंत पाटील विजयी; ईश्वरपूर निकालाची राज्यभर चर्चा ; व्हायरल झाले पोस्टर्स

सांगली : वृत्तसंस्था राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,” या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालातून आली […]
खासगी बसमध्ये थरार; चाकूच्या धाकाने 60 किलो चांदीसह कोट्यवधींची लूट

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर–मुंबई महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या एका सिनेस्टाईल दरोड्याने प्रवाशांमध्ये आणि खासगी बस चालकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे १ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक […]
राज्यातील निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील २९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि क्रिकेटपटू-राजकारणी मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट, पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हेही प्रमुख प्रचारक असतील. याशिवाय […]
मोठी बातमी : ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला; उद्या दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने दोन्ही पक्षातील नेत्यांसह प्रमुखांच्या भेटगाठी वाढल्या आहेत. यादरम्यान ठाकरे बंधु युतीची घोषणा कधी करणार? याबाबत विचारणा केली जात होती. अखेर ती तारीख अणि वेळ निश्चित झाली आहे. खासदार संजय […]
जळगाव मनपा निवडणुकीचा बिगुल; उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आजपासून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, इच्छुक उमेदवारांना आजपासून ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इच्छुक उमेदवार आणि पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी […]
हॉटेलसमोर बांधलेली गाय कारमध्ये कोंबून चोरली; थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद

जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगर परिसरात हॉटेलसमोर बांधलेली गाय अज्ञात चोरट्यांनी कारमध्ये कोंबून चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवार दि. २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असूनही, तब्बल २४ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस धागा लागलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगर भागातील ‘गावकरी […]
देवदर्शनासाठी गेले अन् घरात चोरट्यांनी घातला डल्ला ; लाखांचा ऐवज लंपास !

जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील वाघोदा या मूळ गावी कुटुंबासह देवदर्शनासाठी गेलेल्या वृद्धाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २० डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या […]
चाळीसगाव : पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक, चौघांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव : प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारामुळे आपला पराभव झाल्याच्या रागातून त्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक करणाऱ्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ३मधील आपल्या पक्षाचा उमेदवार अपक्ष उमेदवारामुळे समजातून अपक्ष उमेदवार राकेश भीमराव बोरसे यांच्या स्वामी विवेकानंद कॉलनीमधील घरावर दगडफेक करून मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बोरसे […]