November 15, 2026 1:09 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » खासगी बसमध्ये थरार; चाकूच्या धाकाने 60 किलो चांदीसह कोट्यवधींची लूट

खासगी बसमध्ये थरार; चाकूच्या धाकाने 60 किलो चांदीसह कोट्यवधींची लूट

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर–मुंबई महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या एका सिनेस्टाईल दरोड्याने प्रवाशांमध्ये आणि खासगी बस चालकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे १ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक MH 09 GJ 7272) रविवारी रात्री सुमारे ११ वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झाली होती. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेल परिसरातून तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढल्या. ही बस पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील ‘भुताचा माळ’ परिसरात पोहोचताच बसमधील त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले.

बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या पाच ते सहा साथीदारांनी बसला वेढा घातला. सर्व दरोडेखोर बसमध्ये घुसून अरेरावी करत प्रवाशांना धमकावू लागले. त्यांनी बसमधील सुतळी बारदानातील ३४ किलो आणि प्लास्टिक पोत्यातील २६ किलो अशी एकूण ६० किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, १० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी बस चालक व प्रवाशांना सज्जड दम देत, “या परिसरात थांबू नका, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारू,” अशी धमकी दिली आणि ते पसार झाले. अत्यंत घाबरलेल्या चालकाने बस थेट पुढे नेऊन सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे थांबवत ‘११२’ क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच सांगली व कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच बसमधील प्रवाशांच्या वर्णनाच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. निवडणूक जल्लोषात न्हाऊन निघालेल्या जिल्ह्यात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्गावर खासगी बस लुटली गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!