यावल : प्रतिनिधी
यावल साकळी येथील ११ वर्षीय बालकाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी दारू पाजल्याचा संतापजनक प्रकार समोर आली आहे. नशेत हा अल्पवयीन मुलगा बेशुद्ध पडला होता. या प्रकरणी त्याच्या पालकांनी यावल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रसाड गावातून वाळू घेऊन जाणाऱ्या काही अज्ञात ट्रॅक्टर चालकांनी त्याला घरासमोरून सोबत घेतले. आणि नंतर दारू पाजली. ही गंभीर अवस्था पाहून काही जागरूक नागरिकांनी त्याला तातडीने त्याच्या घरी पोहोचवले. त्याला तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळीच्या सुमारास संबंधित अज्ञात वाळू ट्रॅक्टर चालकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.



