September 22, 2026 4:57 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » राज्य » राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूमागील गूढ वाढले : पोलिस तपासात नव्या धाग्यांचा शोध !

राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूमागील गूढ वाढले : पोलिस तपासात नव्या धाग्यांचा शोध !

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (५७, रा. जामनेर) यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब घेणे सुरू केले. मात्र सर्व विधी झाल्यानंतर आमचे म्हणणे सांगू, अशी भूमिका कुटुंबीयांनी मांडली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिली.

कुटुंबीयांचा जबाब व कावडिया यांचा मोबाईल हाती लागल्यानंतर बरीच तथ्ये समोर येऊ शकतात. बनावट कागदपत्रे वापरून शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राजकुमार कावडिया यांचा सोमवारी (१० नोव्हेंबर) जळगावात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मात्र कावडिया यांचा मोबाईल हाती लागलेला नसल्याने तसेच सुसाईड नोट, व्हिडिओ बाबत असलेली चर्चा पाहता पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला जात आहे. राजकुमार कावडिया यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवण्यासह व्हिडिओ करून ठेवल्याची जोरदार चर्चा जिल्हाभरात सुरू झाली. त्यात अनेक दिग्गजांसह अधिकाऱ्यांचीही नावे असल्याचे सांगितले जात होते. पोलिसांनाही सुसाईड नोट विषयी खात्री वाटू लागली व त्यादृष्टीने त्यांनी शोध घेणे सुरू केले.

मात्र पोलिसांच्या हाती सुसाईड नोट लागली नाही व कुटुंबीयांनीही तशी माहिती नसल्याचे सांगितले यासंदर्भात संशय बळावला असून कोणाचा काही हस्तक्षेप होतोय का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामध्ये शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखीव ठेवला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून त्यातूनच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. मृत्यूपूर्वी कावडिया यांनी यू-ट्यूबवर पाहून विष घेतले होते असे डॉक्टरांना सांगितले आहे. तसेच त्यांच्या मित्राला कॉल देखील केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल असावाच अशी शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!