Home » जळगाव » धक्कादायक : २१ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात संपविले आयुष्य !

धक्कादायक : २१ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील डोमगाव येथे गावाजवळ असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन अजय दीपक पाटील (२१) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२८ जुलै) रात्री डोमगाव येथे घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. अजय हा एका कंपनीत कामाला होता, तर त्याचा लहान भाऊदेखील पुणे येथे कंपनीत नोकरीला आहे. डोमगाव येथे काही दिवसांपूर्वीच एका तरुणाने दुबार पेरणीच्या संकटाने आत्महत्या केल्याची घटना घडून गेली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *