जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महामार्गानजीक असलेल्या कोल्हेनगर परिसरात एका भाड्याच्या घरात बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० वाजता गोळीबाराचा आवाज झाल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झलेली नाही. हा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजदीप राजू सपकाळे (वय ४५) यांच्या घरी बुधवारी रात्री ११:०० वाजता त्याचे दोन मित्र आले होते. मित्र ज्या खोलीत बसले होते, त्याच खोलीतून रात्री अचानक गोळीबाराचा आवाज आला. राजदीपच्या सासू जिजाबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२:३० वाजेच्या सुमारास जेवण करत असतानाच हा आवाज आला आणि आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला असावा. हे दोघे राजदीपचे मित्र नेहमीच घरी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.



