मुक्ताईनगर : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील पोलिस पाटील मुकेश आनंदा तायडे (वय ३८) यांचा नांदवेल फाट्यापासून जवळच असलेल्या जंगल शिवारात रस्त्याच्या कडेला दि. ५ रोजी सकाळी सात वाजता मृतदेह आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नांदवेल गावचे पोलिस पाटील अनिल वाघ यांनी मुक्ताईनगर पोलिसात या संदर्भात खबर दिली आहे. मुकेश तायडे हे पशुवैद्यकीय व्यवसाय करत होते. मुक्ताईनगर तालुक्यात ते सेवा देत होते. नांदवेल गावापासून पाचशे मीटर अंतराच्या आतच रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला या संदर्भात चौकशी सुरू असून, अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे



