पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी X वर पोस्ट करत, ‘अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!’ असे म्हटले आहे.

पुण्यात या महाशयांनी अमित शहा यांच्यासमोर ‘जय गुजरात’ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या, हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या पोस्टसोबत शिंदेंच्या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे.



