November 13, 2026 6:42 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्र्यांनी दिली आमदारांना ताकीद : हाती आयते कोलीत देवू नका !

मुख्यमंत्र्यांनी दिली आमदारांना ताकीद : हाती आयते कोलीत देवू नका !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला देखील दिला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे संस्कार हे वेगळे आहेत. त्यानुसारच पुढे जा, विकासाची कामे करताना आपल्या मतदारसंघाचे हित कशात आहे, त्याचा विचार करूनच ती कामे करा. असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिला आहे. सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका. सरकारच्या विरोधात फेक नरेटिव्हच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आमदारांना कान मंत्री दिला. विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार करायच्या आधीच सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने नॅरेटिव्ह तयार करा, असा सल्ला देखील फडणवीस यांनी आमदारांना दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी आमदारांच्या स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह भोजनासाठी महायुती मधील आमदार आणि मंत्र्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यान गेल्या काही काळात वाचाळवीर ठरलेल्या आमदार आणि मंत्र्यांचे देखील कान मुख्यमंत्र्यांनी खेचले. महायुतीच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याची माहिती दिली. महायुतीतील नेत्यांमधील वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य कोणीही करू नये. एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधकांच्या हाती आयते कोलीत कोणी देऊ नका, अशी सक्त ताकीद देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील आमदार आणि मंत्र्यांना दिली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!