Home » राष्ट्रीय » ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन रिक्षासह दुचाकीचे मोठे नुकसान !

ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन रिक्षासह दुचाकीचे मोठे नुकसान !

जळगाव  : प्रतिनिधी

शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पुलाजवळ रेल्वे स्थानकानजीक दि.२२ मार्च रोजी शनिवारी शहराकडे येणाऱ्या अवजड ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उतारावरून वेगाने मागे गेला. यामुळे मागे असलेल्या तीन रिक्षा आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरकडून शहरात येण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते आज दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास एक ट्रक पुलावर चालत असतांना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्या ट्रक रिव्हर्स गेला तर मागे असलेल्या रिक्षा MH-19-V-9202, MH-15-AK-5312, MH-19-V-8971 दुचाकी: बजाज पल्सर (MH-19-EM-4268), टीव्हीएस ज्युपिटर (MH-19-DU-7865), बजाज पल्सर (MH-19-EB-8278), हिरो स्प्लेंडर (MH-19-EK-9814) याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही रिक्षा पूर्णतः निकामी झाल्या असून चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शनिवारचा बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी होती. अचानक वेगाने मागे जाणारा ट्रक पाहून नागरिक भयभीत झाले. या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रिक्षा चालकांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली असून, संबंधित ट्रक चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *