जळगाव : प्रतिनिधी
जळगाव एसीबीने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीने तक्रारदाराकडून गटारी आणि गावहाळ बांधकामाच्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात तक्रारदाराने २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, ज्यासाठी त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये) केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार २२ मार्च रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. आरोपी ब्राम्हणे यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



