November 6, 2026 10:17 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » एमआयडीसी पोलिसांची कारवाई : डीझेल चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या !

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : डीझेल चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील सम्राट कॉलनी परिसरात उभ्या ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी यावल मधून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाहनांमधील डीझेल चोरीच्या घटना घडत होत्या. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी १६ मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर पार्क केले होते. त्यामध्ये ९,२०० रुपये किंमतीचे १०० लिटर डीझेल भरून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सैय्यद एजाज अकबर ट्रकजवळ गेला असता, टाकीतील संपूर्ण डीझेल गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरी झाल्याची खात्री पटताच तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान, गेल्या काही महिन्यांत परिसरात अशा अनेक चोरीच्या घटना घडल्याचे उघड झाले. मात्र, किरकोळ नुकसान झाल्याने बहुतांश वाहनचालकांनी पोलीस तक्रार दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका संशयित व्यक्तीला मोटारसायकलवरून येऊन नळीच्या सहाय्याने ट्रकच्या टाकीतील डीझेल चोरताना आढळून आले.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी हा यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील सचिन दगडू ठाकूर (२५) असल्याचे समजले. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्या हालचालींवर नजर ठेवली व त्याला राहत्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने डीझेल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १०० लिटर डीझेल जप्त केले आहे.

या कारवाईमुळे परिसरातील वाहनचालक व ट्रान्सपोर्ट मालकांनी पोलिसांचे आभार मानले. वारंवार होणाऱ्या डीझेल चोरीला आळा बसल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित ,पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!