Home » राजकीय » आ.किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

आ.किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव | पब्लिक लाईव्ह जळगाव शहरातील भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबई येथील नंदनवन शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूषण भोळे, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जळगावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राजीक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी आणि तौफिक खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे. जळगाव शहरात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *