जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण लोकार्पण करण्यात येणार आहे.

यासोबतच शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरण झालेल्या इमारतीचे तसेच मुख्य दुग्धशाळेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरण व वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण राहणार आहेत.
या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम, खासदार स्मिताताई वाघ, विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार अनिल पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दूध संघाच्या कामकाजाला तसेच पर्यावरणपूरक व्यवस्थापनाला अधिक बळ मिळणार आहे.
या सर्व विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यास दूध संघाचे सभासद, सदस्य आणि संबंधितांनी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


