जळगाव प्रतिनिधी | जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील साहित्य खरेदी प्रक्रियेत तब्बल १७ कोटी ७२ लाख ६७ हजार ९६४ रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज मंगल पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, १६ ऑक्टोबर २०२० ते २५ मे २०२२ या कालावधीत ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयासाठी दैनंदिन वापराचे साहित्य खरेदी करताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरेदी प्रक्रियेत ई-निविदा पद्धतीचा अवलंब न करणे, आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेता खरेदी करणे, तसेच काही संस्थांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याचे आरोप तक्रारीत नमूद आहेत.
कार्यालयीन आणि रुग्णालयीन वापरासाठी आवश्यक साहित्य खरेदीच्या नावाखाली शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहाराची रक्कम १७ कोटी ७२ लाख ६७ हजार ९६४ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात तत्कालीन अधिकारी डॉ. नागोराव शिवाजीराव चव्हाण, डॉ. यू. बी. तासखेडकर, लेखा अधीक्षक हरीपाल आर. वाणी, मिलिंद निवृत्ती काळे, डॉ. बाबूलाल भंगा बारेला, सहाय्यक अधीक्षक सुधाकर चोपडे आणि महालक्ष्मी महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा अशा सात जणांचा समावेश आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०९, ४२० आणि ३४ अंतर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासातून खरेदी प्रक्रियेत नेमक्या कोणत्या अनियमितता झाल्या, शासनाच्या निधीचा वापर कसा करण्यात आला आणि या व्यवहारातून कोणाला आर्थिक लाभ झाला, हे स्पष्ट होणार आहे. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
Author: K P Chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN


