November 4, 2026 8:15 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » Jalgaon Breaking : शनिपेठ पोलीस ठाण्यात लाच प्रकरणाचा स्फोट! नाईक बडतर्फ, PI बदली

Jalgaon Breaking : शनिपेठ पोलीस ठाण्यात लाच प्रकरणाचा स्फोट! नाईक बडतर्फ, PI बदली

पब्लिक लाईव्ह न्यूज | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडवणाऱ्या लाच प्रकरणानंतर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला थेट बडतर्फ करण्यात आले असून, संबंधित पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

महिनाभरापूर्वी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांमध्ये गंभीर हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, काही दिवसांपूर्वी पोलीस नाईक विनोद अहिरे याला तब्बल १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

वरिष्ठांची तडकाफडकी कारवाई

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कडक निर्णय घेतला आहे. लाच घेताना अटक झालेल्या विनोद अहिरे याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

नवीन जबाबदारी

शनिपेठ पोलीस ठाण्याचा कारभार आता सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

गुन्हे आढावा बैठकीत कानउघाडणी

दरम्यान, आज जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. संवेदनशील प्रकरणांवर विशेष लक्ष देत काही अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून चांगलीच कानउघाडणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!