September 26, 2026 1:26 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

नायलॉन मांजामुळे २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिक : वृत्तसंस्था देशभरात आज मकरसंक्रांतीनिमित्त अनेक ठिकाठिकाणी पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पंतग उडवताना आता नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोनू किसन धोत्रे असे या तरुणाचे नाव […]

“आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील

१७ कोटी निधीतून जळगाव तालुक्यातील १८ किलोमीटर रस्त्यांचे भूमिपूजन संपन् जळगाव :  प्रतिनिधी मंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि आरोग्य सेवांच्या विस्तारावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. तुमच्या मेहनतीमुळेच मी आज ६०हजार मताधिक्याने निवडून आलो आहे. कार्यकर्त्यांची श्रीमंती […]

परळीत वातावरण तापले ; अनोळखीची बसवर दगडफेक !

बीड ; वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी आज संशयित आरोपी वाल्‍मिक कराडला कोर्टात हजर करण्याचा दिवस होता तत्पूर्वी कराड समर्थक परळीत आक्रमक झाल्याचे सकाळपासून दिसून येत आहे. या अनुषंगाने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस रद्द केल्‍या आहेत. सकाळपासूनच कराड समर्थक आक्रमक झाले […]

धनंजय मुंडेंनी याप्रकरणी राजीनामा द्यावा ; शरद पवारांनी मांडले मत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यात चांगलेच वातावरण तापले असून संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी […]

अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा : यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही, !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश आल्यानंतर आता शिंदेंच्या आमदाराने मोठी घोषणा केल्याने चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सिल्लोड येथील अंभई येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, मी आमदार-मंत्री असताना […]

पंतप्रधान मोदी उद्या घेणार महायुतीच्या आमदारांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (दि. 15) दुसर्‍यांदा मुंबई भेटीवर येत आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ व ‘आयएनएस वाघशीर’ या तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण आणि नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिरचे उद्घाटन होणार आहे. याखेरीज मोदी हे महायुतीच्या आमदारांशी संवाद साधून त्यांना कानमंत्र देणार […]

१० गुन्हे दाखल असूनही दुचाकी चोरी : संशयित अटकेत

जळगाव : प्रतिनिधी गेल्या महिन्यात जळगावातून दुचाकी चोरून पसार असलेल्या विजय श्रीराम बारेला (वय २४, रा. धुरकूट, जि. खरगोन) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील देविदास कॉलनीतील भिकन दामू बोरसे यांची दुचाकी दि. १० डिसेंबर रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात […]

error: Content is protected !!