September 26, 2026 12:40 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » महाराष्ट्र » पंतप्रधान मोदी उद्या घेणार महायुतीच्या आमदारांची भेट !

पंतप्रधान मोदी उद्या घेणार महायुतीच्या आमदारांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (दि. 15) दुसर्‍यांदा मुंबई भेटीवर येत आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ व ‘आयएनएस वाघशीर’ या तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण आणि नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिरचे उद्घाटन होणार आहे. याखेरीज मोदी हे महायुतीच्या आमदारांशी संवाद साधून त्यांना कानमंत्र देणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबईच्या नौदल गोदीत त्यांच्या हस्ते सकाळी 10.30 च्या सुमारास ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ व ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होईल. नौदलाने संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या द़ृष्टिकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे. यावेळी पंतप्रधानांसह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.पंतप्रधान मोदी यांना नियोजित कार्यक्रमामुळे महायुतीच्या आमदारांना भेटता आले नव्हते. आता ते भाजपसह महायुतीचे मंत्री, आमदारांना भेटणार आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!