बीड पुन्हा हादरले : भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या !

बीड : वृत्तसंस्था बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची हत्या करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधील किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी एका हत्येच्या घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हत्येचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या […]
डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळे गर्भवती महिलेला मृत्यू !

गडचिरोली : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरण ताजे असताना आता गडचिरोलीमधून देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा धुर्वेला असे मृत महिलेचे नाव आहे. […]
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या प्राथमिक शाळांना भेट

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी भुसावल तालुक्यातील विविध गावांना भेट देत घरकुलाचे बांधकाम, तसेच ग्रामपंचायत इमारतींची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची चव चाखली.यावेळी त्यांच्यासमवेत […]
विदर्भात माणुसकीला काळीमा : संतप्त जमावाने केली पोलीस स्थानकावर दगडफेक !

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना आता राज्यातील विदर्भात वातावरण तापले आहे. पैसे व खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना चिमुर शहरात उघडकीस आली. रात्री साडेदहाच्या सुमारास चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची […]
मंत्री महाजनांनी पाठविली अब्रुनुकसानीची नोटीस : खडसे व थत्ते येणार अडचणीत ?

नाशिक : वृत्तसंस्था मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप करणारे पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. या नोटिसीमुळे पुन्हा एकदा महाजन-खडसे संघर्ष पेटणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार […]
मोठी बातमी : राज्यात बागेश्वर बालाजीचे पहिले मंदिर

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशभर बागेश्वर बाबांच्या अनेक चमत्काराची चर्चा सुरु असतांना आता राज्यातील भिवंडी येथे छतरपूरच्या गडाच्या बागेश्वर बालाजीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. सोमवारी सकाळी ८ ते ९ या शुभ मुहूर्ताच्या दरम्यान, विद्वानांनी बागेश्वर बालाजी, भगवान गणेश, श्री सीताराम दरबार आणि भगवान शिव यांच्या मूर्तींची मंत्रोच्चार करून प्राणप्रतिष्ठा केली. श्री बागेश्वर बालाजी […]
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात सातत्याने कमालीचा बदल होत आहे. साेमवारी वाऱ्याची द्राेणीय रेषा विदर्भ व मराठवाडामार्गे जातेय. त्यामुळे काेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता अाहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी सांगली, साेलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव येथेही तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी […]
न्हावीच्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी येथील मित्रांसोबत पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण अंघोळीसाठी चंद्रभागा नदीत उतरले. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दर्पण निलेश कोलते (वय १८, रा. न्हावी, ता. यावल) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झत्तला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. आठ तासानंतर तरुणाचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली […]
धक्कादायक : अंघोळीसाठी आलेल्या तिघांचा तापीत बुडून दुर्देवी मृत्यू !

यावल : प्रतिनिधी एका ठिकाणी गोंधळाच्या कार्यक्रमाला आलेल्या काही दोन बहिणी आपल्या मुलासह अंघोळीसाठी अंजाळे येथे तापी नदीवर आले असतांना एक दुर्देवी घटना घडली आहे. तापी नदीवर अंघोळीसाठी गेलेला बालक, त्याची आई आणि मावशी अशा तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंजाळे ता. यावल येथे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या महिला […]
व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल राहणार !

मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही कठोर परिश्रमाच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यातही रस वाढेल. यश मिळविण्यासाठी मर्यादा पाळणे आवश्यक आहे. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. मुलांच्या समस्या सोडवण्यात तुमचे योगदान असेल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. वृषभ राशी श्रीगणेश […]